नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरबाडमध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने पोलिसांसाठी तनावमुक्त जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रम – आजचा महाराष्ट्र

मुरबाडमध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने पोलिसांसाठी तनावमुक्त जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रम

प्रतिनिधी

ठाणे (मुरबाड) :- बुधवार दि.२७ रोजी मुरबाड शहरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या सिक्युरिटी सर्विस विंगच्या वतीने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी MMA एमआयडीसी हॉल येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बी.के. डॉ. पुरुषोत्तम भाईजी यांनी ‘स्ट्रेस फ्री लिव्हिंग’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.तनावमुक्त जीवनासाठी ध्यानधारणेचा मंत्र कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बी.के. डॉ. पुरुषोत्तम भाईजी यांनी आनंदी राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “आनंदी राहणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ध्यानधारणा आणि आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आपण सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. आनंदी राहिल्याने शरीरात सकारात्मक रसायने तयार होतात, तर नकारात्मक विचारांमुळे शरीरात हानिकारक केमिकल्स तयार होतात.कार्यक्रमात उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना बी.के. पुरुषोत्तम भाईजी यांनी प्रत्यक्ष ध्यानधारणा करून सकारात्मक ऊर्जेचा अनुभव दिला. यामुळे पोलिसांना तणावमुक्त होण्याची प्रेरणा मिळाली.कार्यक्रमात बी.के. वैशाली दीदी यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना ब्रह्माकुमारी सेंटरवर येऊन मेडिटेशन शिकण्याचे निमंत्रण दिले. यावेळी पोलिस अधिकारी बोलके साहेब, ब्र. कु. राणी दीदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पोलिसांनी या कार्यक्रमाद्वारे तनावमुक्त जीवनाचे महत्त्व समजून घेतले आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांना ध्यानधारणेचा लाभ घेण्यासाठी ब्रह्माकुमारी सेंटरला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]