नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षण प्रशिक्षण संपन्न – आजचा महाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षण प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी सचिन पावशे

रायगड (अलिबाग) :- दि.२१ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर केली होती. २०१८ मध्ये ‘आवास प्लस’ ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे तयार केलेल्या प्रतीक्षा यादीत काही पात्र कुटुंबांचा समावेश नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळू शकला नाही. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत सुधारित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गट विकास अधिकारी व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचे

प्रशिक्षण रायगड जिल्हा परिषदेत शुक्रवारी (दि.२१) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने २०१२ मध्ये गावनिहाय ‘आवास प्लस’ हे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये या सर्वेक्षणाच्या आधारे गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने घरकुलाचा लाभ दिला जात आहे, पुढील काही दिवसात पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता असून, सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ हाती घेण्यात आला आहे.
२०२८-२९ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन राबवली जाणार असून, त्यासाठी पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी नव्याने सुधारित सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीत नसलेल्या आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र असलेल्या कुटुंबांना आता घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनुषंगाने गट विकास अधिकारी व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रशिक्षण रायगड जिल्हा परिषदेत शुक्रवारी पार पडले. जिल्हा पोग्रामार जागृती पोवळे यांनी उपस्थितांना सुधारित सर्वेक्षण बाबत माहिती दिली.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर ‌पठारे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]