विर हनुमान युवक मंडळ तिसेरोहा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी
रायगड – रोहा (तिसे ) : १६ मार्च २०२५ गावातील वीर हनुमान युवक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात ग्रामदेवता आई सोमजाई मातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शिवज्योत आणण्यासाठी मंडळातील १०० ते १५० तरुणांनी किल्ले रायगडावर प्रस्थान केले.रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिरात गेल्या ३७ वर्षांपासून
तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करणारे महेश स्वामी जंगम यांनी अभिषेक, पूजा आणि विशेष आरती केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आरतीनंतर शिवज्योतीचे पूजन करण्यात आले.शिवज्योत मिरवणूक आणि 
स्वागत सोहळा पहाटे चार वाजता किल्ले रायगडावरून निघालेली शिवज्योत सकाळी ९ वाजता तिसेरोहा येथे पोहोचली. गावातील महिला मंडळ, ग्रामस्थ आणि बाळगोपालांनी पारंपरिक वेशभूषेत जल्लोषात शिवज्योतीचे स्वागत केले. दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी कोलाड पोलीस स्टेशनचे प्रभारी आयपीआय श्री. नितीन मोहिते, ए. एस. आय. नरेश पाटील, दत्ता महाडिक, एमएसईबी अभियंता नितीन गुजर यांनी
शिवजन्मोत्सवाच्या पूजनाचा लाभ घेतला. पूजेचे मानकरी म्हणून श्री. व सौ. वैभव गणेश गोरिवले यांना मान देण्यात आला.शिवपालखी मिरवणूक आणि व्याख्यान कार्यक्रम सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेतील ग्रामस्थ आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.संध्याकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज व 
छत्रपती संभाजी महाराजांच्या आरत्या पार पडल्यानंतर रात्री ८.३० वाजता महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर वकील प्रतीक पाटणकर यांचे ‘शिवशंभू चरित्र’ या विषयावर व्याख्यान झाले. ग्रामसचिव नरेश बिरगावले यांनी प्रास्ताविक केले.या वेळी गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते शिवशाहीर प्रतीक पाटणकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री ११ वाजता धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला.या संपूर्ण सोहळ्याला वीर हनुमान युवक मंडळ, ग्रामस्थ, महिला बचत गट, ग्रुप ग्रामपंचायत आणि सर्व शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जय शिवराय!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













