संतोष चव्हाण यांची व्हॉइस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड; १४ फेब्रुवारीला नियुक्तीपत्र प्रदान
प्रतिनिधी
मुंबई (भिवंडी) :- भिवंडी शहरातील ज्येष्ठ पत्रकार संतोष चव्हाण यांची व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी भिवंडीतील सानोबर हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.गेल्या १४ वर्षांपासून ते ‘बापाचा बाप’ या साप्ताहिकाचे यशस्वी संपादन करत असून, त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत कल्याण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.या 
विशेष प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगल डोंगरे, कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे तसेच ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी संतोष चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर संतोष चव्हाण यांनी संघटनेच्या वरिष्ठांचे आभार मानत पत्रकार बांधवांसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. तसेच, ठाणे जिल्ह्यातील सर्व साप्ताहिक संपादकांनी संघटनेच्या कार्यकारिणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारितेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













