नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी

रायगड (पनवेलखारघर) :- प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल मालक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ता सुरक्षेचे महत्व, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंग याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन

करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मो. वा. नि. श्री योगेश शितोळे सर आणि स. मो. वा. नि. प्रिती पवार मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ.

कल्याणी सुरज म्हात्रे, श्री. ब्रिजेश पटेल (जिल्हा सचिव, भाजप रायगड), श्री. किरण पाटील (उपाध्यक्ष, भाजप खारघर) आणि श्री. प्रवीण पाटील (माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका) आदी मान्यवर उपस्थित होते.सौ.सपना पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) येथे करण्यात आले

होते. या वेळी चेअरमन श्री. सुरज नरेश म्हात्रे, प्रिन्सिपल श्री. दीप कोर सैनि, मॅनेजमेंट इन्चार्ज श्री. रेवी शेलदार उपस्थित होते.या अभियानात मारिया मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रो. कुमारी दिपा कृष्णा भैरट, ओमकार मोटर ड्रायव्हिंग स्कूल प्रो. शिल्पा निखिल मावळे, खारघर मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रोप्रायटर गणेश दशरथ साबळे

आणि सागर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रोप्रायटर सागर भद्रा यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.तसेच कार्यक्रमादरम्यान मेडिकल कॅम्पचे आयोजन देखील करण्यात आले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]