नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिशा” रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५: पनवेल विभागाचा दैदिप्यमान ठसा – आजचा महाराष्ट्र

दिशा” रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५: पनवेल विभागाचा दैदिप्यमान ठसा

प्रतिनिधी

रायगड (पनवेल) :- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान भव्य दिव्य “दिशा” रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ यशस्वीरित्या पार पडला. या महोत्सवात राज्यभरातील आरटीओ विभागातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, परिवहन आयुक्त श्री विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त श्री.भरत कळसकर, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत व्यक्तिमत्त्वे श्री.नागराज मंजुळे, श्री.हार्दिक जोशी (राणा दादा) श्री.भूषण कडू, शाहीर नंदेश उमप यांसह परिवहन विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.पनवेल विभागाचा शानदार ठसा पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.जयंत पाटील,उप परिवहन अधिकारी श्री.जयंत चव्हाण आणि

सहाय्यक परिवहन अधिकारी श्री.निलेश धोटे यांच्या मार्गदर्शनाने पनवेल विभागातील खेळाडूंनी आपली कामगिरी गाजवली.वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदकांची लयलूट दीपक भोंडे – लॉन टेनिसमध्ये ३ सिल्व्हर पदके, संजय पाटील – स्विमिंगमध्ये १ सिल्व्हर आणि रायफल शूटिंगमध्ये १ सिल्व्हर पदक, निलेश धोटे – स्विमिंगमध्ये १ सिल्व्हर पदक ,प्रशांत जाधव – बॅडमिंटन मेन्स डबल्समध्ये १ सिल्व्हर पदक ,किरण पाटील – १० मीटर पिस्टल शूटिंगमध्ये १ गोल्ड महिला खेळाडूंच्या दमदार कामगिरीने उत्सवाला नवा रंग राधा बसणकर – धावण्याच्या शर्यतीत ४x१०० रीलेमध्ये गोल्ड, १०० मीटर आणि ५ किमी शर्यतीत २ सिल्व्हर पदके प्रिती पवार – टेबल टेनिसमध्ये २ गोल्ड, रायफल शूटिंगमध्ये १ गोल्ड, व्हॉलीबॉलमध्ये १ सिल्व्हरआरती देसाई – रायफल शूटिंगमध्ये १ सिल्व्हर पदक सांघिक खेळांमध्ये पनवेल संघाची जोरदार लढत व्हॉलीबॉल संघाने प्रथमच सहभाग नोंदवत ठाणे संघाला निकराची झुंज दिली.पनवेल क्रिकेट संघाने जळगाव संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवत सामनावीर म्हणून श्री. सोमनाथ गोरे चमकले. संघात रवींद्र गावडे, शशांक केनी, रोहित कोळप, आरिफ शेख, किरण पाटील, शरद शिंदे, स्वप्निल नेवसे, विशाल जाधव, गणेश नाचणकर, मंगेश नाईक यांसारख्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला.”परिवहन प्रेरणा गीत” ठरले आकर्षण या क्रीडा महोत्सवात श्री. किरण पाटील (मोवानी, पेण) यांनी रचलेले आणि शाहीर नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजात सादर केलेले “परिवहन प्रेरणा गीत” सर्वांचे लक्ष वेधून गेले.पनवेल विभागाच्या यशस्वी वाटचालीत अधिकारीवर्गाचा मोलाचा वाटा या स्पर्धांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उप परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, श्री. गजानन ठोंबरे आणि सहाय्यक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी खेळाडूंचे सातत्याने मनोबल वाढवत त्यांना मार्गदर्शन केले.आयोजकांचे विशेष आभार पनवेल विभागातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत विभागाचा ठसा उमटवला. उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानत पुढील वर्षी अजून जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]