धाटाव एमआयडीसी प्लॉटवर घनकचऱ्याचे थैमान
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील MIDC गोरगरीब शेतकरी गरजू मजूरकर यांना उपजीविकेचे साधन देण्यासाठी बसलेली कंपन्यांची एम.आय.डी.सी आहे परंतु तालुक्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध असलेली अशी तिची ओळख एकेकाळी गरजू लोकांचे उपजीविकेचे साधन असलेल्या या एमआयडीसीला राजकीय अस्तित्वाने पोखरली गेल्याचे दिसत आहे अनेक ग्रामपंचायत तिच्या अधिकार क्षेत्राने वेढले गेलेल्या
असल्यामुळे गटातटाच्या राजकीय नेत्यांच्या अस्तित्व तेथे दिसून ठेकेदाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे त्यामुळे आजूबाजूला नागरिकांच्या उपजीकेवर परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याच दिसते ठेकेदारी मुळे स्थानिक रोजंदारी करणाऱ्यांना वगळून परप्रांतीय मजुरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसत आहे कंपनीने प्रशासनाने याचा योग्य फायदा उचलून कंपनीतून निघणारे वेस्टेज अपायकारक पाणी सरळ पद्धतीने नदीत सोडणे निघणारा अपायकारक गॅस वातावरणाचा योग्य फायदा घेऊन हवेत सोडणे कंपनीतून निघणारा
अपायकारक कचरा अंधाराचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीत टाकून निसर्गाचा समतोल खराब करण्याचे प्रयत्न करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे त्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन तक्रारी केल्याचेही प्रसिद्धी माध्यमातून दिसते परंतु आपल्या फायद्यासाठी नेमलेल्या स्थानिक राजकीय ठेकेदारांचा फायदा त्यांना वेळोवेळी झाल्याचे दिसत आहे अशाच प्रकारे एमआयडीसीतील बलाढ्य उत्पन्न असणारी ग्रामपंचायत लगतच 
अशीच बंद पडलेल्या एका कंपनी प्लॉटवर घनकचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनवलेले दिसत आहे लगतच असलेले गावाचे साम्राज्य असं का नाही कोणीही एक तक्रार करताना दिसत नाही याचे आश्चर्य या डम्पिंग ग्राउंड वर पाळीव भटके प्राणी यांचा घोळका सतत अन्नाच्या शोधात दिसत आहे त्यातच तेथून लगतच असणारे रस्त्यावर कामगार वर्गाची रहदारी बरोबर अनेक गावातील लोकांची येजा तिथून सतत दिसत असल्यामुळे या भटक्या प्राण्यांमुळे अपघात होण्याबरोबरच प्रदूषणही वाढत आहे तरी या बाबींकडे दखल कोण घेणार असे जनतेतून बोलले जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













