नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! तोफगाड्याचा साज अवचितगडावर – आजचा महाराष्ट्र

जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे! तोफगाड्याचा साज अवचितगडावर

प्रतिनिधी

रायगड (रोहा) :- शिवशंभो प्रतिष्ठान महा/१७२/२०१५ आयोजित ऐतिहासिक तोफगाडा लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ३:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यासाठी झिजलेल्या ऐतिहासिक दुर्ग अवचितगडावर या तोफेला तोफगाड्याचा साज अर्पण करण्यात आला. शिवशंभु प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत या तोफेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला.कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दुर्गसंवर्धन आणि शिवकालीन ऐतिहासिक वारसा जतन करण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांनी शिवकालीन परंपरेचा अनुभव घेतला आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.हा उपक्रम केवळ दुर्गसंवर्धनाचा नव्हे, तर स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण जागवण्याचा एक प्रयत्न ठरला. शिवशंभु प्रतिष्ठानच्या या ऐतिहासिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]