भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा; संघमित्रा अंगणवाडीच्या वतीने ध्वजवंदन
प्रतिनिधी
मुंबई (भिवंडी) :- भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर येथे संघमित्रा अंगणवाडी क्रमांक ८८ च्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अबूबकर, पत्रकार अशोक पाटोळे, उद्योजक अमितोष पंडित, युवा नेते राजेंद्र साठे, रेखाताई साठे, ज्येष्ठ कार्यकर्ता नामदेव काळे इत्यादी मान्यवर 
उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे नगर मधील अंगणवाडीच्या सेविका वैशाली पाटोळे यांनी केले होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अबूबकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून भारताच्या संविधानाप्रति निष्ठा व्यक्त केली. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे नगर मधील संघमित्रा अंगणवाडी कार्यक्षेत्रातील लहान बालक, मुली, स्तनदा माता , गरोदर माता व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी यावेळी समता, बंधुता व स्वातंत्र्य या संविधानातील महत्त्वाच्या तत्त्वांवर प्रकाश टाकला.या यशस्वी कार्यक्रमाबद्दल संघमित्रा अंगणवाडीच्या सेविका वैशाली पाटोळे व मदतनीस विठाबाई अंदुरे आणि त्यांच्या सहकार्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













