रत्नागिरीतील श्री माडवनीदेवी मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर, सातपानेवाडी (माडवणे) येथील अति दुर्गम आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले श्री माडवनीदेवीचे मंदिर हे नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.माडवनीदेवी मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा पौष शुक्ल शके १९४६, शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचा
तपशील:सकाळी ७ ते ८: अभिषेक (श्री. विनायक प्रकाश शेलार व सौ. दीपाली विनायक शेलार)सकाळी ८ ते १०: सत्यनारायणाची महापूजा सकाळी १० ते १२: सामुदायिक भजन दुपारी १२ ते १२:३०: महिला मंडळ हळदीकुंकू समारंभ दुपारी १२:३० ते १: सन्माननीय मान्यवरांचे सत्कार दुपारी १ ते ३: महाप्रसाद सायंकाळी ६ ते ८: सामुदायिक हरिपाठ (ग्रामस्थ मंडळ)सर्व भक्त, भाविक आणि अध्यात्मप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहून भजनाद्वारे होणाऱ्या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा, अशी माडवनीदेवी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने विनंती आहे.स्थळ: श्री माडवनीदेवी मंदिर, मु. पो. खवटी, सातपानेवाडी (माडवणे), ता. खेड, जि. रत्नागिरी.व्यवस्थापक: माडवनीदेवी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













