अमृतधारा गोशाळा धगडवाडी येथे श्री राधेश्वर भारती महास्वामी यांची पाद्यपूजेचा सुवर्ण योग
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :- अमृतधारा गोशाळा धगडवाडी, तालुका रोहा येथे श्री रामचंद्रापुरम मठाचे परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य श्री. श्री. राधेश्वर भारती महास्वामी यांच्या पाद्यपूजेचा सुवर्ण योग गोशाळेचे संस्थापक श्रीकृष्ण भट यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात 
आले होते.पाद्यपूजेचा मान श्री विजयराव शिंदे, श्री अजयराव लोटनकर आणि कोलाड पोलिस ठाण्याचे नरेश पाटील यांनी केला. या प्रसंगी जगद्गुरुंनी उपस्थित हिंदू समाजबांधवांना धर्मकार्यासाठी प्रेरणा देत हिंदू जनजागृती आणि धर्मरक्षणाच्या भावी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.या कार्यक्रमाला अमृतधारा गोशाळेचे संस्थापक श्रीकृष्ण भट, हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी संघटनेचे सदस्य, तसेच वीरशैव माहेश्वर मंडळ रोहा-सुधागड माझी अध्यक्ष व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंग रोहा-सुधागड विभाग प्रमूख श्री महेश स्वामी जंगम उपस्थित होते.कार्यक्रमाला कोलाड पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. धर्मप्रेमी आणि गोशाळेच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.धर्मकार्यासाठी सामूहिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













