कै. दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भव्य सायकल वाटप कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :– कै. दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त सुनीलजी तटकरे युवा प्रतिष्ठान व वर्धाताई चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. दिनाभाई मोरे शिक्षण संस्था संचालित कै. कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालय तीसे येथे २७ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष यशवंत खराडे होते, तर प्रमुख पाहुणे महेश स्वामी जंगम माजी अध्यक्ष रायगड जिल्ह्य केंद्रीय 
शाळा तिसे व सदस्य कृ स माध्यमिक विद्यालय तिसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्ष सौ. प्रीतमताई पाटील उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष यशवंत खराडे, उपसरपंच जयेश घावटे, ग्रामपंचायत तिसेचे सदस्य विनोद कदम, ग्राम सचिव नारायण गोरीवले, माजी उपसरपंच दगडू शिकवण, माजी तंटामुक्त अध्यक्ष धर्मा गोरीवले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात श्री. लीलाधर जांभेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाच्या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ गोधे, शालेय शिक्षण समिती सदस्य काशिराम गोरीवले आणि सर्व शिक्षक व ग्रामस्थ वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचा सांगता श्री. लीलाधर जांभेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. उपस्थित विद्यार्थी, पालक, आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले व आयोजकांचे अभिनंदन केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













