श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती सुनील तटकरे यांचा ऐतिहासिक विजय
श्रीवर्धन प्रतिनिधी
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अदिती सुनील तटकरे यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. त्यांच्या या यशामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण असून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अदिती तटकरे यांनी आपल्या प्रगल्भ राजकीय दृष्टिकोन, प्रभावी प्रचार, आणि मतदारांशी सुसंवाद साधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या नेतृत्वाने श्रीवर्धन मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

“हा विजय श्रीवर्धनातील जनतेच्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
त्यांच्या विजयामुळे महिला सशक्तीकरणालाही बळ मिळेल, असे मानले जात आहे. अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केलीआहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













