सातारा जिल्ह्यात नवारस्ता येथे अव्वल चहाच्या शाखेचे उद्घाटन, श्री. यशराज शंभूराजे देसाई यांच्या हस्ते
प्रतिनिधी शाशिकांत माथणे
सातारा :- सातारा जिल्ह्यातील नवारस्ता येथे अव्वल चहाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन मा. श्री. यशराज शंभूराजे देसाई (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेचे मालक श्री. राजेंद्र माथणे आहेत, आणि त्यांनी ग्रामीण भागात उच्च दर्जाचा अव्वल चहा उपलब्ध करून

देण्याचे ध्येय साध्य केले आहे.ग्रामीण भागात प्रथमच अव्वल चहा ब्रँडच्या शाखेचे आगमन झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. अव्वल चहाची प्रतिष्ठा आणि चव आता ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे चहा प्रेमींना आपल्या परिसरातच उच्च दर्जाचा चहाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













