नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जारी – आजचा महाराष्ट्र

मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जारी

प्रतिनिधी

रायगड :- भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार दि.२० नोव्हेंबर २०१४ रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे,

अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड किशन जावळे जारी केला आहे.अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडणे याकरिता बुधवार दि.२० नोव्हेंबर २०१४ रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद राहणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]