नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कु. यश पाटीलचा तृतीय क्रमांक – आजचा महाराष्ट्र

अहमदनगर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कु. यश पाटीलचा तृतीय क्रमांक

प्रतिनिधी

नवी मुंबई :- महाराष्ट्र शासन अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्या नगर, अहमदनगर जिल्हा कुस्ती संघ आणि बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२४-२५, दिनांक १४ व १५ ऑक्टोबर रोजी पार पडली. १९ वर्षांखालील मुलांचे फ्री स्टाइल व थ्रीको, तसेच मुलींच्या फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात झालेल्या या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.एन.आय.एस कोच पै. श्री. संदीप दळवी यांच्या

मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रेड गाव (तालुका – शिराळा, जिल्हा – सांगली) येथील कु. यश संजय पाटील याने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सध्या नवी मुंबईतील तेरणा ज्युनियर कॉलेज नेरुळमध्ये शिक्षण घेत असलेल्या यशने नवी मुंबई महानगरपालिका तालीम संघातून खेळताना हा मान मिळवला आहे.या यशामुळे कु. यश पाटील आणि त्याचे कोच पै. श्री. संदीप दळवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेचे आणि आपल्या गावाचे नाव उंचावले आहे.,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]