नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड किल्ले ते आळंदी देवाची बस सेवा शुभारंभ: शिवभक्तांच्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण – आजचा महाराष्ट्र

रायगड किल्ले ते आळंदी देवाची बस सेवा शुभारंभ: शिवभक्तांच्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण

प्रतिनिधी

रायगड :- शिवशाहीर ह. भ. प. आकाश महाराज भोडवे पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रयत्नांमुळे रायगड ते आळंदी देवाची बससेवा सुरू करण्यात आली आहे. माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांनी यासाठी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे.ही बससेवा सुरू करण्यासाठी शिवभक्तांनी दीर्घकाळ प्रयत्न केले होते. रायगडावर उपोषण करून अखेर ही सेवा

सुरू करण्यात आली. ३२ वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यासाठी सातत्याने येणारे महेश स्वामी जंगम(रोहा) यांनी यावेळी बसची पूजा करून प्रवासाचा शुभारंभ केला.ही बससेवा सुरू झाल्यामुळे शिवभक्तांसाठी रायगड ते आळंदी देवाची प्रवास सुलभ झाला आहे, आणि यामुळे हजारो भक्तांना शिवतीर्थापासून संतांचे माहेरघर आळंदीपर्यंतचा प्रवास करणे सोयीचे झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]