सुदर्शन केमिकल लिमिटेडने नवरात्रोत्सवात दिली शिक्षणाची नवी दिशा
प्रतिनिधी.
रायगड(रोहा) :- रोहा तालुक्यातील तांबडशेत गावातील शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थिनी कुमारी प्रणाली प्रकाश पवार हिला दुर्गाष्टमीच्या दिवशी सुदर्शन केमिकल लिमिटेडच्या कलाकार वर्गाने नवी सायकल देऊन तिच्या शिक्षणप्रेमाला नवी उभारी दिली. प्रणाली ही लहानपणापासूनच शिक्षणात रुची असलेली आणि जिद्दीने अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे. १०वी शिक्षणासाठी तिला दररोज २० किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. गावापासून मुख्य रस्त्यापर्यंतचे ३ किलोमीटर अंतर तिला पायी चालावे लागे, एसटी बस मिळाली तरच पुढचा प्रवास शक्य होई, अन्यथा संपूर्ण प्रवास चालत करावा लागे.तिच्या या जिद्दीची माहिती सुदर्शन केमिकल
लिमिटेडच्या सुधा फाऊंडेशन व CSR टीमकडे पोहोचली. या कंपनीच्या कलाकार मंडळींनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात मिळवलेल्या बक्षिसांची रक्कम एका विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रवासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रणालीला नवी सायकल भेट देऊन तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.प्रणालीला सायकल देण्याचा कार्यक्रम सुदर्शन केमिकल लिमिटेडच्या रोहा येथील कार्यालयात पार पडला. या वेळी साईड हेड श्री विवेक गर्ग, HR मॅनेजर श्री शांताराम सोनावणे, सेफ्टी हेड श्री मनीष, सिक्युरिटी मॅनेजर श्री गणेश भांबुडकर आणि सेफ्टी मॅनेजर श्री गोपाल लोखंडे यांच्या उपस्थितीत प्रणालीचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक देखील या प्रसंगी उपस्थित होते.कलाकार मंडळातील श्री दिलीप पवार, श्री गणेश देशमुख, श्री परेश म्हात्रे, श्री रविकांत दिघे, श्री राकेश म्हात्रे, श्री जितेंद्र पाटील, श्री निकेत खेरडकर, श्री सचिन कदम, कु. अभिजीत सावरकर, कु. कासिफ, कु. राज, कु. सुबोध, डॉ. सुष्टी दवे, कुमारी प्रज्ञा गोले, कुमारी सायली कराले, सौ. वैशाली प्रजापती आणि सौ. सोनल बर्वे यांनी या उपक्रमात विशेष योगदान दिले.श्री वैभव नाईक, श्री विक्रम मोरे, श्री दिनकर पाटील, श्री गुरुविंदर सिंग, श्री उमाकांत गायकवाड, आणि सौ. माधुरी सनस यांचे आभार मानण्यात आले.या उपक्रमामुळे सुदर्शन केमिकल लिमिटेडने नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकीचे एक नवा आदर्श उभा केला आहे, शिक्षणासाठी समर्पित अशा विद्यार्थिनीला प्रोत्साहन देऊन तिच्या पुढील प्रवासाला बळकटी दिली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













