प्रजापिता ब्रह्माकुमारीज राष्ट्रीय पत्रकार परिषदेसाठी व्हाईस ऑफ मिडिया भिवंडी टीम रवाना.
प्रतिनिधी
मुंबई (भिवंडी) :- शांतता आणि संवादाच्या घसरत्या प्रगतीला कारणीभूत असलेल्या मूल्य प्रणालीला लक्षात घेऊन अध्यात्म आणि नैतिकतेला महत्त्वपूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. समाजाच्या हिताच्या मुख्य उद्देशाने शेवटी लोकांवर प्रभाव टाकण्यात मीडियाची भूमिका ही शक्तिशाली आणि अपरिहार्य भूमिका आहे. यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारीज राष्ट्रीय पत्रकार परिषदेसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष फारूक मेमन, ठाणे जिल्हा समन्वयक संतोष चव्हाण, भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे, कार्याध्यक्ष महेंद्र सोनवणे, संघटक प्रविण सूर्यराव, प्रशांत मोरे आणि इतर सदस्य आनंद सरोवर, अबू रोड, राजस्थानला रवाना झाले
आहेत.गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर ते सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निरोगी आणि आनंदी समाजासाठी अध्यात्मिक सक्षमीकरण आणि माध्यमाची भूमिका, सोशल मीडियाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या याचा समाजावर होणारा परिणाम इत्यादी महत्त्वाच्या विषयावर संपूर्ण देशातून आलेले मान्यवर पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम अरवली पर्वताच्या रांगेत माउंट अबूच्या पायथ्याशी असलेल्या स्वच्छ प्रसन्न पर्यावरण पूरक आध्यात्मिक रित्या भरलेल्या शांत वातावरणातील प्रजापिता ब्रह्माकुमारीज, आनंद सरोवर परिसर, अबू रोड येथे होणार आहे.या राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे आयोजन राजीव एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन ची मीडिया विंग आणि सहयोजक ब्रह्माकुमारीज संस्थेची भगिनी संस्था यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













