मल्हारपेठ पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी: गहाळ/चोरी झालेले २.५९ लाख रुपये किमतीचे १० मोबाईल हस्तगत, मूळ तक्रारदारांना परत
प्रतिनिधी शशिकांत मटाने
सातारा (मल्हारपेठ ) :- सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याने नागरीकांचे हरवलेले व चोरी झालेले २.५९ लाख रुपये किमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मा. समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, आणि मा. विजय पाटील, पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांच्या 
नेतृत्वात मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली.मुलभूत तांत्रिक बाबींचा वापर करून, पोलीस पथकाने सी.ई.आय.आर. पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले मोबाईल शोधण्याची प्रक्रिया सुरु केली होती. अथक परिश्रमांनंतर, २.५९ लाख रुपये किमतीचे १० मोबाईल परत मिळवले गेले. आज सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मछले यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना हे मोबाईल वितरित करण्यात आले.यापूर्वीही, जुलै व ऑगस्ट महिन्यात मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले ६.३२ लाख रुपये किमतीचे २७ मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना परत केले आहेत. सदर मोहीम ही मा. समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, आणि मा. विजय पाटील, पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, महिला पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या या मोहिमेला सातत्याने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासार्हता वाढीस लागली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













