नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरी गणपती सण गोड झाल्याने महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघटनेने केला खेड प्रशासनाचा जाहीर सत्कार – आजचा महाराष्ट्र

गोरी गणपती सण गोड झाल्याने महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघटनेने केला खेड प्रशासनाचा जाहीर सत्कार

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघटनेकडून खेड चे पोलिस निरीक्षक नितीन भोयर व खेड चे तहसीलदार सुधीर सोनावणे यांचा पोलिस पाटलांचे वाढीव १५०००/- नुसार चार महिन्यांचे मानधन जमा झाल्याने धन्यवाद म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या खेड प्रशासनाचा जाहीर सत्कार करण्यात आला.  महाराष्ट्र गावं कामगार पोलीस संघटनेकडून जाहीर झालेले वाढीव मानधन व इतर मागण्या मान्य व्हाव्या म्हणून नागपूरला राज्य मेळावा घेण्यात आला होता.या मेळाव्यात महाराष्ट्र

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मानधन जमा होईल असा GR काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील पोलिस पाटलांचे एकूण ४ महिन्यांचे ६००००/- मानधन गणपती सणा अगोदर जमा झाल्याने खऱ्या अर्थाने पोलिस पाटलांचा गणपती सण गोड झाला आहे. या मानधन वाढीसाठी महाराष्ट्र गावं कामगार संघटनेचा सिंहाचा वाटा आहे.पोलिस पाटलाना खऱ्या अर्थाने मान व धन म्हणजे समाधान कारक मानधन* देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही संघटनेकडून खेड तालुका अध्यक्ष नितीन बेलोसे यांनी आभार मानले.या मानधन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या खेड महसूल विभाग व गुह खाते प्रशासनाचे गणपतीसणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघटने कडून जाहीर सत्कार करण्यात आला .या वेळी तालुक्यातील सर्व पोलिस पाटील बंधू भगिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]