नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लाकडी बैलांना साज घालून तान्हा पोळा रंगला – आजचा महाराष्ट्र

लाकडी बैलांना साज घालून तान्हा पोळा रंगला

प्रतिनिधी सचिन चौरसिया

नागपूर (रामटेक) :- विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा सुरु आहे. लहान चिमुकल्चासाठी आनंदाची चंगल घेऊन येतो. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळ नंदी बैल घेऊन चिमुकले एकत्र होतात. यात कुणी बैलासह लावलेल्या सामाजिक संदेश , सजवलेले नंदी बैल ,अन् नटलेले चिमुकले , खाऊची धमाल , बोजार्‍याचे समाधान

आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासुन महापुरुषांची वेशभुषा यामुळे मुलांचे कौतुक होऊन बक्षीस दीले जाते. फटाक्याच्या आवाजाणे तोरण तोडुण पोळा फोडल्या जातो . या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरीता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.या उत्साहात वार्डातील सुरेश उराडे, संजय लेंडे , महादेव बिसन , ओमप्रकाश गव्हाणे, महेश गव्हाणे, हरीभाऊ चिंचोळकर, कन्हायासिंग ठाकुर, अशोक पटेल, मंगेश पायतोड, संजय मुलमुले, गजु बिसने, चक्रवती आंबाडारे , वामन वैद्य, रवि कुर्वे रविंद्र पगाडे, संजय उराडे, राकेश बिसने, बबलु पटेल, भाविन पटेल, कार्तिक उराडे योगेश बिसन, रविंद्र बिसन, दिनेश बिसन, कविताताई मुलमुले, पद्माताई ठेंगरी, प्रतिक्षा बिसने, नेहा बिसने, सोनाली बिसने अर्चना आंबाडारे, शोभा बिसन, नैन्ना पटेल शांता बिसन, आशा बिसने उपस्थीत राहुन तान्हा पोळ्याचा उत्सहात पार पडला.

*शेकडो कुटुंबाला मिळतो रोजगार* 

लाकडी नंदी बैलांची विक्री करून आज शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. यंदा नंदी बैल विक्रीसाठी सज्ज असून, ५०० ते ३ लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा बाजारात वेगळी रौनक असल्यानं या वर्षी किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचं बैल उत्पादकांचं म्हणणे आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]