नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघटनेत खेड तालुक्यातील पोलीस पाटलांचा जाहीर प्रवेश – आजचा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघटनेत खेड तालुक्यातील पोलीस पाटलांचा जाहीर प्रवेश

प्रतिनिधी राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघटनेने उत्कृष्ट कामकाज आणि मानधन वाढीच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक पोलीस पाटलांचा विश्वास संपादन केला आहे. यामुळे खेड तालुका पोलीस असोसिएशनमधील पोलीस पाटील पांडुरंग शिर्के (चाटव), चंद्रकांत मोरे (आस्तान), रोशन शिर्के (मिर्ले), प्रशांत भोसले (खोपी तांबट), सुजाता जाधव (सुकुवली)

आणि सुमित चिकणे (मोहाने) यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे.या प्रसंगी खेड तालुका संघटनेचे अध्यक्ष नितीन बेलोसे म्हणाले, “आपण संघटनेसाठी करत असलेल्या कामाची ही पोच पावती आहे. संघटनेतील प्रत्येक पोलीस पाटलाच्या सुखदुःखात आणि संकटाच्या काळात ही संघटना नेहमीच पाठीशी उभी असेल.बेलोसे यांनी सांगितले की, खेड तालुक्यातील अजूनही बरेच पोलीस पाटील या संघटनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे सचिव महेंद्र खसासे आणि खजिनदार संजय बहुतुले यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व पोलीस पाटलांचे हार्दिक अभिनंदन केले. या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील सुमारे सत्तर पोलीस पाटील उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]