नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन; सत्यजितसिंह पाटणकर यांची तीव्र प्रतिक्रिया – आजचा महाराष्ट्र

पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन; सत्यजितसिंह पाटणकर यांची तीव्र प्रतिक्रिया

प्रतिनिधी शशिकांत माथने

पाटण (लक्ष्मीपुत्र) मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली असून, यासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली आहे. पाटण येथे महाविकास आघाडीसह विविध संघटनांच्या वतीने “जोड़े मारो आंदोलन” आयोजित करण्यात आले होते. यावेळी पाटणकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याचे कोसळणे हे भ्रष्टाचाराचे एक उदाहरण

असून, राज्यातील आजच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी आपल्या कमिशन आणि टक्केवारीच्या लोभातून ही दुर्दैवी घटना घडवून आणली आहे.सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी पुढे बोलताना असेही स्पष्ट केले की, छत्रपतींच्या पुतळ्याला टक्केवारीच्या लोभाने हात लावणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. राज्यभरात भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा फैलाव झाला असून, मालवण येथील पुतळ्याच्या घटनेमुळे या गोष्टीचा पुरावा मिळाला आहे. या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता नक्कीच धडा शिकवेल, असे ते म्हणाले.यावेळी राज्यातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांविरोधात नागरिकांमध्ये संताप असून, महाविकास आघाडीसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आपला विरोध दर्शवला. या घटनेनंतर दोषींवर येत्या दहा दिवसांत कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही पाटणकर यांनी केली.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार, सरचिटणीस सुभाषराव पवार, संजय इंगवले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, तसेच अन्य मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर शेडगे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]