नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था तुर्भे,नवी मुंबई तर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावणकर या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप… – आजचा महाराष्ट्र

संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था तुर्भे,नवी मुंबई तर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावणकर या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी(खेड):- सोमवार दिनांक २६/०८/२०२४ रोजी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेतर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावणकर तालुका खेड या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक सकपाळ यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच श्री स्वामी समर्थ मठ,कशेडी येथील व्यवस्थापक श्री.समीर मोरे,यांचा देखील शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी ,श्री.समीर मोरे, यांनी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी गोष्ट सांगितली. अध्यक्ष श्री. अशोक सकपाळ यांनी विद्यार्थ्यांसमोर उद्बोधक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी प्रेरणा दिली.यावेळी कशेडी गावणकर या शाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर इंग्रजी विषयाच्या विविध कृती उत्तम रितीने सादर केल्या. याबद्दल उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी अध्यक्ष श्री अशोक सकपाळ यांनी कशेडी गावणकर या शाळेला एक संगणक संच देण्याचे जाहीर

केले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गजानन मादगे, उपाध्यक्षा सौ.हर्षदा खसासे, पोलीस पाटील सौ.स्वरा गावणकर, शिक्षण प्रेमी श्री.एकनाथ गावणकर, पदवीधर शिक्षक श्री.मंगेश चाळके उपशिक्षक श्री.मनोहर पेंडखलकर, उपशिक्षक श्री.केशव नागरगोजे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर कोळेकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]