नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बदलापूर घटनेचा मल्हारपेठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तीव्र निषेध – आजचा महाराष्ट्र

बदलापूर घटनेचा मल्हारपेठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तीव्र निषेध

प्रतिनिधी शशिकांत माथने 

पाटण :बदलापूर येथे शाळेतील एका कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर केलेल्या घृणास्पद अत्याचाराच्या घटनेचा पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या मल्हारपेठ विभागातील तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला-भगिनींनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या क्रूर घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.या घटनेत आरोपीवर कडक कारवाई करण्याऐवजी शासनाने या अत्याचारी घटनेची उपेक्षा करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे, या शासनाच्या निष्क्रीयतेचा आणि अन्यायकारक भूमिकेचा मल्हारपेठ विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करताना शासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.या घटनेने समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे, आणि शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावी, अशी जनतेची मागणी आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]