नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सरकारची इव्हेंटबाजी जोमात माता-भगिनीची सुरक्षा कोमात – आजचा महाराष्ट्र

सरकारची इव्हेंटबाजी जोमात माता-भगिनीची सुरक्षा कोमात

प्रतिनिधी सचिन चौरसिया

नागपुर (रामटेक) :- महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होत आहेत. सरकार काहीच करत नाहीय. जिथे हे प्रकार घडलेत, त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता. पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतंय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना? १५०० रुपये देता, भिखारी आहे का?राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंटबाज महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने रामटेक मधील गांधी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन मूक आंदोलन करण्यात आले. जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कानात या मूक आंदोलनाचा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही. सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनताच आता जागे करणार आहे.रामटेक येथील गांधी चौक येथे झालेल्या मुक निषेध मोर्चा प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे,पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, राष्ट्रवादी(शरद पवार) पार्टीचे रामटेक तालुका प्रमुख श्री. नकुल बरबटे, युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना तालुका प्रमुख समीर मेश्राम, महिला रामटेक तालुका प्रमुख कलावती तिवारी, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, उपशहर प्रमुख सचिन देशमुख, राहुल टोंगसे, मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेश भोंदे, युवासेना तालुका प्रमुख निकुंज गराडे, शुभम डुकरीमारे व सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व शिवसैनिक याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]