मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी
मुंबई :- मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्ष, 
मुंबई यांनी केले आहे.या भागांतील हवामान परिस्थितीचा विचार करता, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













