नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन – आजचा महाराष्ट्र

बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील प्रतिष्ठित बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. २२ ऑगस्ट २०२४ रोजी हा विभाग रुग्णसेवेत दाखल करण्यात आला असून, याच दिवशी तीन यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या नव्या विभागामुळे खेड तालुका व परिसरातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यल्प खर्चात नेत्रचिकित्सा सेवा उपलब्ध होणार आहे. एमबीबीएस आणि MS

सर्जन यांच्या तज्ञ मार्गदर्शना खाली हा विभाग कार्यरत आहे. बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विभागामुळे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत सुगम आणि किफायतशीर पद्धतीने होणार असून, अधिकाधिक रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]