नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेण नगरपरिषदच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ‘माझा पेण ‘ ह्या संघटनेचा अशुद्ध पाणी पुरवठ्या बद्दल भव्य मोर्चा संपन्न – आजचा महाराष्ट्र

पेण नगरपरिषदच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ‘माझा पेण ‘ ह्या संघटनेचा अशुद्ध पाणी पुरवठ्या बद्दल भव्य मोर्चा संपन्न

प्रतिनिधी विकास सोष्टे

रायगड (पेन) :- दिनांक २२/०८/२०२४ रोजी पेण नगरपरिषद च्या ढिसाळ कारभाराविरोधात भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने विषय होता तो अशुद्ध पाणी पुरवठा पेण शहराला होतो त्याबद्दल. या मोर्च्यात आपापली राजकीय पादत्राणे बाजूला ठेऊन शहरातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्त्याने आपापले विचार मांडताना पेण नगरपरिषदच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचला. तद नंतर पेण नगरपरिषदचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रत्यक्ष सामोरे जाऊन मोर्च्याच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर कोणाला काही बोलायचे असेल तर आपल्यापैकी काही जण माझ्या दालनात येऊन आपले म्हणणे सांगू शकता असे सांगितले त्याप्रमाणे मोजकी मंडळी दालनात गेली. परंतु तिथेदेखील कारभारावर तोंडसूख घेण्यास मागेपुढे पाहिले नाही.२०२१ सालापासून निवडणूक न झाल्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरु आहे. ह्याअगोदर असलेल्या श्रीमती अर्चना दिवे मॅडम यांचा जर कार्यकाळ असता तर आज पेण शहराचे नंदनवन झाले असते. असे स्पष्ट मत मोर्च्यातील काही नागरिकांनी व्यक्त केले. मुख्याधिकारी म्हणून जीवन पाटील यांची कार्यशैली कुचकामी ठरत आहे असा सूर मोर्च्यातील काही मंडळी काढत होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]