नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी – आजचा महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी

प्रतिनिधी सचिन चौरसिया

तहसील कार्यालय रामटेक वर काढला संयुक्त विरोधी रॅली 

नागपुर (रामटेक) :- अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमीलेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, २१ ऑगस्ट रोजी १४ तासांसाठी भारत बंदची हाक दिली होती.सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती व जमाती आरक्षणात क्रिमीलेअर लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध दलित आदिवासी संघटनाद्वारे पुकारलेल्या बंदला समर्थन देत बुधवार दि. २१ ऑगस्टला दुपारी एक वाजता डॉक्टर आंबेडकर चौक रामटेक येथुन तहसील कार्यालय रामटेक पर्यंत विरोध रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तहसीलदार रमेश कोळपे यांना यांचेमार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले. हा निर्णय बाबासाहेबांच्या संविधानाला अनुषंगाने विरोध करणारा आहे हा निर्णय ओबीसी, एससी, एसटी जाती जातीत फूट पाडणारा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला या रॅलीत गोंडवाना गणतंत्र पार्टी, सीपीआय एम, प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, ओबीसी संघटना, सोशल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई चे पदाधिकारी हरीश उईके, रमेश कारमोरे अँड.आनंद गजभिये, राजू हटवार, सौ कांचनमाला माकडे, राहुल जोहरे, अमित अंबादे, प्रयास ठवरे, मनीष खोब्रागडे, राजेश सांगोळे भारती गजभिये,रियान खान ,नाना उराडे महेश बनन्होटे, प्रवीण बेले सहित समर्थक उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]