बहीण- भावाच्या नात्याची वीण घट्ट ! आ. आशिष जयस्वाल
प्रतिनिधी सचिन चौरसिया
गंगाभवनात पार पडला भव्य दिव्य रक्षाबंधन सोहळा
नागपुर(रामटेक) :- श्रावण ममहिन्यात अनेक सणाची रेलचेल असते. त्यातील एक महत्त्वाचा सण रक्षाबंधन अर्थात बहीण भावाच्या नात्याचा अतुट सोहळा दि. १९ आँगस्ट २०२४ सर्वत्र साजरा करण्यात आला.बंधू-भगिनीच्या अतूट बंधनाची साक्ष देणारा कार्यक्रम म्हणजे ‘रक्षाबंधन’. आज बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून आपले संरक्षण करण्याची शपथ घ्यायला लावते. पुराणामध्ये यावर विविध कथाही आहेत. आजच्या परिस्थीतीचं 
सर्वांना गांभीर्य आहे. त्यात सामाजिक कार्य करण्यात पुढे असलेल्या परमात्मा एक आनंदधाम रामटेक च्या सौजन्याने भागवत कृपा प्राप्ती पूर्वप्रभात यात्रा व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान अंतर्गत आज शहरातील गंगाभावनामध्ये भव्य दिव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधन सोहळा प्रसंगी रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल व महात्मा गांधी व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत महाराष्ट्र शासन व ब्रँड अँबेसिडर लक्ष्मण मेहर (बाबूजी) यांची प्रमुख उपस्थिती तर शहरातील असंख्य महिलांनी रक्षाबंधन सोहळ्यात सहभाग घेतला होता. सकाळी शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मणराव मेहर यांच्या निवासस्थानावरून ही शोभायात्रा निघून शहरातील मुख्य रस्त्यावरून गंगाभवन येथे या यात्रेची सांगता करण्यात आली होती. आमदार जयस्वाल बैलगाडीतून प्रवास करत या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. शहरातील असंख्य महिलांनी या सोहळ्यात सहभागी असलेले आमदार आशिष जयस्वाल यांना राख्या बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग मेहर राष्ट्रीय अध्यक्ष, परमात्मा एक आनंदधाम व सर्व सेवक सेविका- आनंदधाम, रामटेक यांनी केले होतें.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













