नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी बदलापूर शहर बंद – आजचा महाराष्ट्र

चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी बदलापूर शहर बंद

प्रतिनिधी सचिन चौरसिया

बंदचा पुकारात बदलापुरात पोलीसांचा चोख बंदोबस्त

नागपूर :- बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली.या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. अखेर मनसेने या

प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय. ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचा घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी बदलापूर बंदचं आवाहन करण्यात आलं होत. सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत बदलापूरकरांना हे आवाहन करण्यात आलं असून या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी ६.३० वाजता आदर्श शाळेवर शांततेत नागरिकांचा मोर्चा निघणार आहे.शाळा प्रशासनाने बदलापूरकरांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचं बदलापूरच्या मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका दामले यांनी सांगितलं आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं होतं. या बंदमधून मेडिकल आणि दूध सेवा मात्र वगळण्यात आली असून बाकी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]