मद्यधुंद कारचालकामुळे एका दिवसाच्या बाळाचे अपघातात हरवले छत्र… काकु-पुतण्याचा दुर्दैवी अंत
प्रतिनिधी सचिन चौरसिया
नागपुर (रामटेक) :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक-मौदा मार्गावर एका भरदाव कारच्या धडकेत दुचाकी चालक व मागे बसलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.मृतक दुचाकी चालक सचिन मलचंद ठकरेले वय ३० वर्ष व विजया भीमराव ठकरेले वय ५२ वर्ष रा.हमलापुरी हे आपल्या मोपेड क्रमांक एमएच ३६ एएम ११७५ हिने हमलापुरी वरून रामटेक कडे येत असतांना रामटेककडून मौदा कडे भरदाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक सीजी ०४ एनएच ६५१५ यातील मद्यधुंद कारचालकाने आपल्या ताब्यातील 
वाहन निष्काळजीपणाने चालवून आमोरासमोर मोपेडला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक सचिन व काकू विजया हे २० ते ३० फूट वर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले. तर उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना दोघांचाही मृत्यू झाला.धडक देणाऱ्या कारमध्ये ३ लोकांचा समावेश असून तिघेही दारू पिऊन असल्याचे लक्षात आले.पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.एका दिवसाच्या बाळाचे अपघातात हरवले छत्र या अपघातात मृत झालेले सचिन यांच्या पत्नीची कालच रिआण हॉस्पिटल रामटेक येथे प्रसूती होऊन सुंदर बाळ जन्माला आला.मात्र दुसऱ्या दिवशी पत्नीसाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना वाटेत झालेल्या अपघाताने एका दिवसाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून बापाचा छत्र हरवला गेला. या घटनेचा संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













