सरपंचांनी विकासाच्या दिशेने ठोस पाऊले उचलावीत: यशराज देसाई
प्रतिनिधी
पाठण :- मल्हारपेठ, पाटण तालुका गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरपंचांनी सर्वांना सोबत घेऊन ठोस पावले उचलावीत, असा संदेश लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी दिला. शिवशाही सरपंच संघाच्या संपर्क दौऱ्याच्या समारोपप्रसंगी मल्हारपेठ येथे आयोजित कार्यक्रमात देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी गावाच्या विकासासाठी सरपंचांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पाटण पंचायत समितीचे सदस्य सुरेश
पानसकर, देसाई कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलावडे, तसेच विजय देशमुख, विजय शिंदे, किरण दशवंत, पुरुषोत्तम चव्हाण, सूर्यकांत पानसकर आणि आर. बी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.देसाई म्हणाले, “गावाचा विकास हा सरपंचाच्या दूरदृष्टी आणि ठोस कृतीवर अवलंबून असतो. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे.” विजय पवार यांनी आपल्या भाषणात पाटण तालुक्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्यांनी या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील गावांसाठी विविध योजना व कामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत सरपंच संघाच्या कार्यकर्त्यांनी विकासकामांसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













