डॉ. रामदास आठवले यांचा कोकणात भव्य सत्कार आणि मेळावा
प्रतिनिधी
रत्नागिरी :- दि.१४ ऑगस्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांनी सलग तिसऱ्यांदा सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री पदभार स्वीकारला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि देशातील शोषित, वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या त्यांच्या संकल्पनाबद्दल संपूर्ण
कोकणवासियांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा सोहळा शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:३०ते ४:३० वाजेपर्यंत बासू हॉटेल आणि रिसॉर्ट, भरणे नाका, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे पार पडणार आहे.कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल सकाळी ११:३० वाजता साहेबांचे मुंबईहून खेड रेल्वे मार्गे आगमन आणि स्वागत.-१२:००वाजता माता जिजाई उद्यान येथील भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.१२:१५ वाजता खेड सम्राट अशोक नगर येथे मा. ना. डॉ. रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब भवनाचे भूमिपूजन.१२:४५ वाजता भरणे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.१:००वाजता जे. पी. कॉम्प्लेक्स येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे कोकण प्रांत कार्यालयाचे उद्घाटन.२:३० वाजता डॉ. रामदास आठवले साहेबांचा भव्य दिव्य सत्कार आणि कोकणवासियांचा मेळावा.४:३० वाजता सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात प्रत्यक्ष भेट आणि निवेदन स्वीकारणे.या कार्यक्रमासाठी कोकण प्रदेश अध्यक्ष मा. प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष राहूल डाळींबकर, उपाध्यक्ष काशीनाथ रुपवते, युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ आणि इतर पदाधिकारी, भीमसैनिक, महिला आघाडी आणि कोकणवासीय मेहनत घेत आहेत.समस्त कोकणवासीयांना या महत्त्वाच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













