नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ

प्रतिनिधी

रायगड :- राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह, अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या योजनेचा उद्देश महिलांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबन यावर केंद्रित आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या भाषणात योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी प्रभावी कामगिरी करावी, असे आवाहन केले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रायगड जिल्ह्यातील यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जाईल. तसेच आदिवासी महिलांसाठी १५ वर्षांचा प्रमाणपत्र पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. या उपाययोजनांमुळे योजनांचा लाभ घेणे महिलांसाठी अधिक सुलभ झाले आहे.माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आरोग्य आणि

पोषणात सुधारणा करण्यासाठी ही योजना क्रांतिकारक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनीही राज्य शासनाचे आभार मानले आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील तब्बल ३.५२ लाख महिलांनी या योजनेसाठी पात्रता प्राप्त केली आहे, तर आणखी ९० हजार अर्ज प्रक्रियेत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]