नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जीवन धारा आणि क्रायच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरी पढाई देश की भलाई’ स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

जीवन धारा आणि क्रायच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरी पढाई देश की भलाई’ स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन

प्रतिनिधी

मुंबई :– १६ ऑगस्ट २०२४: जीवन धारा आणि क्राय या सामाजिक संस्थांनी शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २४ जून २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान नॅशनल एज्युकेशन कॅम्पेन अंतर्गत ‘पुरी पढाई देश की भलाई’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाअंतर्गत, मुंबई उपनगरातील

विविध भागांमध्ये स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली, ज्यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या मुलांना शिक्षण घेण्याची गरज पटवून दिली गेली.या मोहिमेचा मुख्य उद्देश होता की समाजातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्यात आला. मागील दीड महिन्यात जीवन धारा संस्थेने शाळा, महाविद्यालये, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग, आंगणवाडी केंद्रे, वकील, पालक, नगरसेवक, आमदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बचत गट इत्यादी ठिकाणी जनजागृती केली. शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी विविध स्तरांवर स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.जीवन धारा ही संस्था मागील २६ वर्षांपासून शैक्षणिक विषयांवर कार्यरत आहे. मुलांना

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच ६ ते १८ वयोगटातील मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. चिता कॅम्प, साठेनगर मानखुर्द, आणि अमन शांती नगर, कोटन ग्रीन, मुंबई येथे मुलांसाठी अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये बालवाडी ते इयत्ता १० वी पर्यंतचे मोफत अभ्यास वर्ग घेतले जातात, तसेच मोफत संगणक प्रशिक्षणही दिले जाते.बाल संसद उपक्रमाअंतर्गत मुलांचे हक्क काय आहेत याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येते. फुटबॉलच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक विकासाला प्रोत्साहन दिले जाते.

गरीब आणि होतकरू मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यांच्या कुटुंबांना अन्न-धान्य वाटप केले जाते.जीवन धारा संस्थेच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत, तर काहींनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले आहेत. अनेक शाळा सोडलेल्या मुलांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. ‘शिक्षण हेच उज्ज्वल भविष्य घडवण्याचे साधन आहे’ या ब्रीदवाक्यासोबत जीवन धारा संस्था पुढेही आपले सामाजिक कार्य अविरतपणे करत राहील.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]