शालेय मुख्यमंत्री तमन्नाच्या हस्ते पार पडले ध्वजारोहण
प्रतिनिधी सचिन चौरसिया
जि.प.प्राथ.शाळा शिवणी(भो.) येथील अनोखा उपक्रम
नागपुर (रामटेक) :- दि.१५ ऑगस्ट २०२४ ला ७७ व्या स्वातंत्र्यदिन वर्धापन दिनानिमित्ताने केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी (भो.) ता.रामटेक जि.नागपुर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते केले जात होते. परंतु यावर्षी मात्र विशेषतः म्हणजे नवीन शालेय मंत्रिमंडळ स्थापन केले होते.ही प्रक्रिया प्रत्यक्ष पद्धतीने विद्यार्थ्यानी मतदान करून निवडणुकीतून निवडून आलेल्या शालेय मुख्यमंत्री कु.तमन्ना वाल्मीक भलावी वर्ग चौथा या
विद्यार्थिनी च्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. अशा पद्धतीने ध्वजारोहण करण्याचा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या जि.प.प्राथ.शाळेच्या शालेय मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री असणाऱ्या मुलीच्या हस्ते करण्यात आला.या नवोपक्रमाची चर्चा संपूर्ण तालुका, जिल्हा राज्यभर होत आहे. असे विविध नवोपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी येथे कायमस्वरूपी होत असतात यामुळें विद्यार्थ्यांना सुप्तगुण, वक्तृत्वगुण, सर्जनशील, बुद्धिमत्ता, जबाबदारी व इतर मूल्य रुजवण्यासाठी सोयीस्कर होत असते अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक निलेश नन्नावरे यांनी दिली.या कार्यक्रमाला अध्यक्ष विकास गणवीर (केंद्रप्रमुख) ,रामू मेहर (तंटामुक्त समिती अध्यक्ष), गणेश बडवाईक (पो.पाटील), हिंगवे (ग्रामसेवक) ग्रा.प सर्व सदस्य, कर्मचारी, गावातील इतर नागरिक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश ननावरे मुख्याध्यापक यांनी केले तर संचालन किसना पाटील सह शिक्षक यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













