नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेती सिंचनसाठी पाणी हवंय मग ‘ही’ अर्ज केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी – आजचा महाराष्ट्र

शेती सिंचनसाठी पाणी हवंय मग ‘ही’ अर्ज केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

स्वाभिमानी संघर्ष समितीची एसडीओ निवेदनद्वारे मागणी

नागपुर (रामटेक) :- यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खिंडसी जलसाठे तुडूंब भरलेले आहेत. जलशयामध्ये शेती सिंचनासाठीदेखील राखीव पाणी ठेवण्याची सोय असते मात्र, दरवर्षी पाणीटंचाईमुळे शेतीपिकांना पाणी पुरवठा करणे शक्य नसते. यंदा स्थिती ही बदलेली आहे.खिंडसी जलाशयाचे पाणी प्रकल्पग्रस्त कोरडवाहू शेतजमिनी करिता जलाशयाच्या लगतच्या गावांना पुरवठा करण्याबाबत स्वाभिमानी संघर्ष समितीचे मा. उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन. रामटेक शहराची जीवन वाहिनी म्हणून खिंडसी जलाशयाला ओळखले जाते. सोबतच पर्यटनाच्या दृष्टीने हे जलाशय विख्यात आहे. परंतु या जलाशयाच्या शेतकऱ्यांना काही फायदा होताना मारली का खूप वर्षापासून निदर्शनास येत नाही. एवढ्या मोठ्या जलाशयाची निर्मिती रामटेक शहराला पिण्याच्या पाण्याकरिता होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि ते मिळायलाच पाहिजे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात गेली त्यांचं काय? त्यांच्या मुलाबाळांच काय? याकडे शासनाचे किती लक्ष आहे हा प्रश्न उद्भवतो.

         आज अशी स्थिती आहे की रामटेक शहराला जितकं पाणी वर्षभरात लागते त्याच्या कितीतरी पट जास्त पाणी खिंडसी जलाशयात आहे परंतु त्या पाण्याच्या उपयोग काही उद्योगपतींना तसेच राजकीय नेत्यांना वोटिंग व स्वतःचे व्यवसाय चालविण्याकरिता होत आहे.इतकेच नाही तर या तलावालगतची जमीन डागबेल अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीकरिता देण्यात यायची ती पण जवळपास देणे बंद झाल्यासारखे आहे. मागील कित्येक वर्षापासून जलाशयालगतच्या गावातील म्हणजेच पंचाळा, महादुला, मांद्री,घोगरा, मुसेवाडी, गुडेगाव, भंडारबोळी,शिवनी, किरणापुर, हसापूर इत्यादी गावातील शेतकरी जलाशयातील पाणी सिंचनाकरिता व गुराढोरां करिता मागणी करत आहेत. संघर्ष करत आहेत. एवढेच नाही तर शासनाने कालव्याकरिता जमिनीची पाहणी करून शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्याबाबतचे पत्र सुद्धा दिले होते.कुठेतरी शेतकऱ्यांना आपला पाण्याच्या प्रश्न सुटला असे वाटत असताना सदर प्रकल्पाला स्थगिती देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

              अशा वेळेस हा प्रश्न निर्माण होतो की कुणाच्या फायद्यासाठी व कुणाचे घर भरण्यासाठी हा प्रकल्प थांबविण्यात आलेला आहे. खरंच पर्यटनाच्या नावाखाली सदर भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत नाही का? असा अन्याय जर जगाच्या पोशिंद्यावर होत असेल तर ते योग्य नाही. या भागातील शेतकरी राजनेत्यांकडे चक्रा मारून थकले. परंतु या राजनेत्यांना झोपेतून जाग येईल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. म्हणून सदर ग्रामीण भागातील शेतकरी आपला प्रश्न घेऊन आमच्याकडे म्हणजेच स्वाभिमानी संघर्ष समितीकडे आलेत.त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन या सर्व गावातील शेतकऱ्यांना निस्वार्थपणे सहाय्य करून त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याकरिता संपूर्ण स्वाभिमानी संघर्ष समिती पूर्ण मदत करण्याचे आश्वासन आम्ही त्यांना दिले व या प्रश्नावर समोरचे पाऊल म्हणून उपविभागीय अधिकारी साहेब रामटेक यांना स्वाभिमानी संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय सुरेशजी वांदिले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी स्वाभिमानी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिलजी मुलमुले, सचिव सेवकजी बेलसरे, तालुकाध्यक्ष अमीतजी बादुले,विनायकजी महाजन, नरेंद्रजी डहरवाल, गोपालजी काटोके, धनराजजी झाडे, मनोहरजी दियेवार, रामलालजी वैद्य, संजयजी साकुरे, अर्जुनजी बावनकर, सुरेशजी बागडे, मनोहरजी बरबटे, संतोषजी डोहाळे, बंडूजी रामटके तसेच इतर पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]