नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी.के. दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटीत १० वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी.के. दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटीत १० वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

प्रतिनिधि राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड):- दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी.के. दरेकर ज्युनिअर कॉलेज, खवटी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, तालुका सेवा समिती खेड यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप व इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दिलीपजी राणे साहेब होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीते सादर केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणपीठ नाणीजधाम युवा पीठ निरीक्षक श्री. सुनीलजी वीर, पीठधर्म धर्मक्षेत्र प्रमुख श्री. दत्तात्रय मोरे, जिल्हा ॲम्ब्युलन्स प्रमुख श्री. बेंद्रे, जिल्हा सचिव श्री. सौरभ चाळके, तालुका सेवाध्यक्ष श्री. नेवरे, प्रसिद्धी प्रमुख श्री विजयराव भोसले,

माजी संजीवनी प्रमुख श्री. चाळके, मराठा क्रांती जिल्हा सामाजिक संघटना अध्यक्ष श्री .कृष्णा शेलार, तसेच इतर पदाधिकारी, भक्तगण, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कोदारे मॅडम यांनी करत, संस्थेच्या इतिहासाची माहिती दिली. जिल्हा ॲम्ब्युलन्स प्रमुख श्री बेंद्रे यांनी महाराजांचा संदेश “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” विद्यार्थ्यांना दिला. तसेच इतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता १० वी मध्ये ७०% वरील गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, वही व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय दळवी व श्री बेंद्रे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]