म्हसळा तालुका तहसील कार्यालयाकडून हर घर तिरंगा बाईक रॅली
प्रतिनिधि जावेद धनसे
रायगड (म्हसळा) :- दिनांक १०/०८/ २०२४ रोजी म्हसळा तालुक्याचे न्याय दंडाधिकारी तहसिलदार यांनी त्यांच्या अधिकारातील पंचायत समिती कार्यालय म्हसळा नगरपंचायत म्हसळा व इतर शासकीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर 
तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले १५ ऑगस्ट च्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये महसूल शासनाकडून सेवा सप्ताह चालू आहे त्यातच तिरंगा रॅलीचे नियोजन केले जाते त्याच अनुषंगाने म्हसळा तालुक्याचे न्याय दंडाधिकारी तहसीलदार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाचे एकत्रिकरण करून त्यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस चेक पोस्ट म्हसळा ते तहसिल कार्यालय म्हसळा वेळ सकाळी ६.३० वाजता मोठ्या प्रमाणात बाईक रॅली 
काढून जनजागृती व जनतेत उत्साह निर्माण केला शहरा शहरातून व गाव खेड्यातून तून भारत माता की जय असे नारा देत त्यांनी बहुसंख्येने एकत्र येऊन नागरिकांना जागृत केले तसेच संपूर्ण म्हसळा तालुका तिरंगा मय केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













