रामटेक लोकसभेत राजु पारवे यांचा पराभव
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
राजु पारवे यांच्या पराभवांची भुमिका कोणाची ?१० वर्षांनी रामटेकच्या गडावर फडकला कॉग्रेस झेंडा
नागपुर (रामटेक) :- रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शामकुमार बर्वे यांचा लढतीत शिवसेना (शिंदे गट ) उमेदवार राजु पारवे यांचा पराभव करत विजय खेचून आणला.शिवसेना (शिंदे गट) अनेक दिग्गज्जांना घरी बसवून नवख्या उमेदवारांना तिकीट दिले. यातून शिवसेना (शिंदे गट) नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. रामटेक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उमरेड विधानसभेतुन पारवे यांनी काँग्रेसच्या आमदार पदाचा राजीनामा देवून शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये प्रवेश केला. तर जि. प. माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणतत्र रद्द झाल्याने काँग्रेसने त्यांचे पती शामकुमार बर्वे 
यांना उमेदवारी दिली. राजु पारवे यांच्या प्रचारासाठी महायुती यांनी पंतप्रधान मोदी यांची जाहीर प्रचार सभा कन्हान येथे ठेवण्यात आली. तर अनेक दिगज्ज नेत्यानी लक्ष घातले. उमरेड मतदाससंघातील मतदार असल्याने पारवे यांना फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र काँग्रेस नी शिवसेना (शिंदे गट) चा मनसुभा हाणून पाडण्यासाठी बर्वे यांच्या पाठीशी जोरदार ताकद लावली.दोन वेळा खासदार राहिलेले कृपाल तुमाने यांचे तिकिट कापून शिवसेना (शिंदे गट ) चे राजु पारवे यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने कन्हान येथील शामकुमार बर्वे यांना तिकिट देत या निवडणुकीत रंगत आणली. शामकुमार बर्वे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे सुनिल केदार लक्ष घालत किंगमेकर ठरत शिवसेनेचे मनसुभा हाणून पाडण्यासाठी बर्वे यांच्या पाठीशी जोरदार ताकद लावली. त्यामुळे बर्वे आणि पारवे यांच्यात लढत झाल्याचे पाहायला मिळाले.शामकुमार बर्वे सुरुवातीस तब्बल १२ हजार मतांचे लिड घेत समोर होते. ती तोडण्यासाठी राजु पारवे यांना खुब झुंज करावी लागली. ती लिड तोडून आणण्यासाठी हजारांचे मताधिक्य घेत आणि आपला विजय खेचून आणवा लागत होते. पंरतु शामकुमार बर्वे हे मात्र आपल्या मताचे लिड घेत राजु पारवे यांना मोठा धक्का देत, शामकुमार बर्वे विजयाचे शिल्पकार ठरले. दरम्यान, या मतदारसंघात सर्वात जास्त महिलांनी प्रतिनिधित्व करत यात शामकुमार बर्वे यांचा ७६६६० मताधिक्यानी विजय झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













