महाराष्ट्रात ९ जुन तर केरळात ३१ मे ला मान्सुन येण्याचा अंदाज
प्रतिनिधि सचिन चौरसिया
नागपूर:- नैऋत्य मोसमी पावसाला मान्सुन म्हनतात. नैऋत्य मान्सून देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटावर दाखल झाल्याची माहीती हवामानशास्त्र विभागाने दिली. तपणार्या उन्हाने अंगाची लाही लारी होत असल्याने प्रत्येकाला आता पावसाची प्रतिक्षा आहे.

सध्या देशाचे बरेचसे भाग उष्णतेच्या लाटेशी झुंज देत आहेत. कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अनेक राज्यांमधील तापमानाचे विक्रम मोडीत निघत आहेत आणि आरोग्य आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहेत. दक्षिण भारतात एप्रिलमध्ये उष्णतेची लाट आली. सध्या वायव्य भारतात तशीच स्थिती आहे. उष्णतेमुळे पॉवर ग्रीड्सवर ताण पडत आहे आणि जलस्रोत कोरडे पडत आहेत. देशाच्या काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा सामान्यपेक्षा जास्त मान्सूनच्या पावसाचा अंदाज देशासाठी मोठा दिलासा आहे. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे. शेती लागवडीखालील ५२ टक्के क्षेत्र त्यावर अवलंबून आहे. जून आणि जुलै हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे महिने असून या काळात खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या होतात. देशभरातील वीजनिर्मिती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय भरून काढणे देखील महत्त्वाचे आहे.
मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती कायम राहिली तर ३१ मे च्या सुमारास मान्सून केरळात दाखल होणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे २८ मे ते तीन जून या कालावधीत यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होणार असे म्हटले जात आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर शेतीकामांनी वेग पकडला आहे. भारतातील असणार्या हिंदमहासागरात मान्सूनला अनुकुल होत आहे.हिंदमहासागरात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला असुन मान्सूनसाठी अनुकुल आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सूनची अंदमानमधील वाटचाल वेगाने सुरु आहे. आयएमडीच्या अंजानुसार यंदा १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला असुन .त्यानंतर पुढल्या १० दिवसांत तो केरळ मध्ये येवू शकतो. त्यानंतर पुढील दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल. .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













