नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उष्णतेची लहर ट्रकने केला कहर ! – आजचा महाराष्ट्र

उष्णतेची लहर ट्रकने केला कहर !

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- कोळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. त्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. ही घटना नागपूर जिल्हातील पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आमडी फाट्याजवळ महामार्गावर कोळशाने भरलेल्या ट्रकला आग लागली. यामुळे महामार्गावरील वाहतुक तिन तास ठप्प होती.कन्हान गोंडेगाव उपक्षेत्रातून महाजनको खापरखेडा जाणार्‍या एम एच-४० सीडी-७९४८ क्रमांकाच्या ट्रक हा एकुण ३८ टन ७५० किलो कोळसा

घेवून जात होता. कोळसा भरलेल्या १६ चाकी ट्रकला आमडी फाट्याजवळ अचानक पेट घेतला. घटनेची माहीती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी पारशिवनी नगरपंचायतच्पा अग्निशमक दलाला पाचारण केल्यानंतर तासाभरात आग विझविण्यात आली. यादरम्यान महामार्गावरील वाहतुक सुमारे तिन तास ठप्प होती. नागपूर जिल्हात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे त्यामुळे या ट्रक ला आग लागली असावी. पुढिल तपास पोलीस अधिकारी पारशिवनी करीत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]