नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उन्हाळी सुट्टीत चक्क चिमुकल्यांना वाचनाची आवड निर्माण करून देण्याचे शिक्षक प्रसाद साळवी यांचा उपक्रम . – आजचा महाराष्ट्र

उन्हाळी सुट्टीत चक्क चिमुकल्यांना वाचनाची आवड निर्माण करून देण्याचे शिक्षक प्रसाद साळवी यांचा उपक्रम .

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- शाळेला उन्हाळी सुट्टी लागते कधी आणि आम्ही मौज मजा करतो कधी अशी चिमुकल्यांची स्थिती असते मात्र याच चिमुकल्यांना अधिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून रोहा तालुक्यातील केंद्र शाळा पुगाव येथील कार्यरत असलेले शिक्षक प्रसाद साळवी हे यावर एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहेत तर चक्क भर सुट्टीत मुलांचा शैक्षणीक विकास व्हावा तसेच सुट्टीतील पूर्ण दिवस विनाकारण उन्हात भटकंती करत जाऊ नये ही भावना शिक्षक साळवी यांनी लक्षात घेऊन त्यांची बुद्धी, कला, तसेच वाचन,विविध गोष्टी यावर लक्ष वेधून त्यांना विरंगुळा म्हणून त्यांची वैचारिक प्रगल्भतेवर भर देऊन एक अनोखं उपक्रम राबवत असल्याने त्यांच्या उपक्रमाचे येथील पालक ग्रामस्थ कौतुक करत आहेत,

उन्हाळी सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव की प्राण.
मामाच्या गावाला जाणे, खूप फिरणे, उन्हातानातून भटकंती, मोबाईलवर कायम गेम खेळणे, टीव्हीवरील कार्टून पाहणे,साधारणपणे या गोष्टींमध्येच आपली ग्रामीण भागातील मुलं सुट्टीच्या दिवसात अडकलेली दिसतात.पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची वैचारिक समृद्धी व्हावी, या सुट्टीमध्ये देखील त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून त्यांचे मनोरंजन देखील व्हावे या भावनेतून आपल्या पुगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री प्रसाद साळवी सर यांनी हा एक सुट्टीतला उपक्रम सुरू केला आणि त्याचा भरभरून आनद येथील बालक घेत आहेत.

वाचन संस्कृती टिकली पाहिजे वाचाल तर वाचाल वाचनानंतर मुलांची बौद्धिक क्षमता आणि त्यांचा शारीरिक विकास व्हावा सुट्टीत जी मुलं गावात उपलब्ध आहेत आणि खेळायला उगीचच इकडे तिकडे उन्हातानातून भटकत असतात, मोबाईल मध्ये अडकलेली असतात त्यांना आपल्या पुगाव गावातील ग्रंथालयातून त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन त्याचे मनापासून वाचन करणे, त्यातून वाचनाचा निखळ आनंद घेणे, आवश्यक वाटल्यास टिपण काढणे असा उपक्रम साळवी सरांनी सुरू केला असून त्यास विद्यार्थी व पालक वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभतोय. नक्कीच आशा आहे की या छोटेखानी उपक्रमाचा भविष्यात खूप मोठा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सत्कारणी लागावे असे प्रयत्न शिक्षक साळवी सर करत असताना दिसत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]