नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विधवा महीलेच्या घरी धाडसी चोरी – आजचा महाराष्ट्र

विधवा महीलेच्या घरी धाडसी चोरी

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

सोने व रोख रक्कम मिळून ४५०००/- हजाराचे ऐवज लंपास

नागपुर (रामटेक) :- शहरातील गांधी चौक- अंबाळा रोड वर मध्ये असलेले नेहरु वार्ड श्रीमती तुळसाबाई महाजन यांचा घरा जवळ असलेल्या मेहर दांपत्य यांचा घरी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी समोरील दार तोडुन हजारो रुपयाचे चोरट्यांनी ऐवज चोरुन नेला या चोरी मध्ये हजारो रुपये हे सोने व रोख रक्कम लंपास केली .रामटेक येथील निवारी श्रीमती संध्या मेहर ह्या आर. डी.

कलेक्शनचे काम करतात. मेहर या १५ मे रोजी आईला भेटण्पासाठी तुमसर येथे गेल्या असता चोरांनी याच वेळेचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातुन बेडरुम मध्ये सदर चोर हे घुसुन त्यांनी अलमारी फोडुन रोख रक्कम ३५ हजार ,२ सोन्याचे टाँप्स, जुनी चांदीची पेडस्टल, २ चांदीचे करंडे, चांदीचा कमरबंध, अंगठी असा एकुण रक्कम ४० ते ५० हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या संदर्भाची तक्रार पोलीस स्टेशन रामटेक येथे करण्पात आली असुन अज्ञात चोरट्यांवर भादवि ४५४, ५७, ३८० कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचा मार्गदर्शना खाली रामटेक पोलीस करीत आहे.रामटेक तालुक्यात चोरीचे प्रामान वाढत असुन चोरीचे प्रकार थांबत नाही आहे. मागील काही दिवसा पूर्वी रामटेक येथे विविध ठिकाणी चोरी झाली असुन अजुन पर्यत पोलीसांना चोर पकडण्यात यश आले नाही.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]