नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी – आजचा महाराष्ट्र

गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

प्रतिनिधि

रायगड :- दि.१६.गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.१७ मे २०२४ रोजी सकाळी ३.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास मार्गे नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत.भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या

कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाहतूक करण्याचे काम Total Movements Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे. सेलची लांबी १०.२०. रूंदी ५.९७ मिटर व उंची ५.५२ मिटर व लांबी ७.७० मिटर, रुंदी ५.९७ मिटर व उंची ५.६३ मिटर आहे. अलिबाग ते रोहा रस्ता रा.प.म.९१ किलोमीटर २/२०० ते १४/०० दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत या सेलची वाहतुक ही दि.१७ मे २०२४ रोजी सकाळी ३.०० ते ८.०० वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासेल ची रूंदी व उंची जास्त असल्याकारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता एम.एस.इ.बी. यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबतच पत्र Total Movements Pvt. Ltd. या कंपनीने प्राप्त करुन घेतले आहे.ही वाहतूक करतेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याने वाहन चालक व नागरीक यांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून उपाय योजनेच्या दृष्टिकोनातुन ही वाहतूक दि.१७ मे २०२४ रोजी सकाळी ३.०० ते ८.०० वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]