रामटेक कृ. उ. बाजार समितीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
१० महीण्याचा कालावधीत उत्पन्न २ कोटीचा वर निव्वळ नफ्यात पाच पटीने वाढ
नागपुर (रामटेक) :- कृषी उत्पन्न बाजार समीती रामटेकला या आर्थिक वर्षात बाजार फीच्या (सेस) शेतकरी- अडतिया-व्यापारी यांच्या माध्यमातुन २ कोटी ४ लक्ष १२ हजार ०८५ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. समितीने बाजार फी (सेस) मध्ये वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात बाजार समितीचा उत्पन्नात तब्बल १ कोटीची वाढ झाली आहे.कृ. उ. बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक एप्रिल २०२३ रोजी सचिन किरपान यांच्या नेतृत्वात झाली असुन १८ पैकी १४ संचालक निवडुन आले. सचिन किरपान यांची सभापती व सौ. लक्ष्मीताई कुमरे यांची उपसभापती पदी अविरोध निवड करण्यात आली. सचिन किरपान यांनी बाजार समितीची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुनिलची केदार यांचे
मार्गदर्शनाखाली अवघ्या १० महीण्यात बाजार समितीचे उत्पन्नात विक्रमी वाढ झाली.रामटेक कृषी उत्पन समितीची स्थापना सन १९७३ ला झाली असुन बाजार समीतीला ५० वर्ष पूर्ण होवून ५१ वर्षाला सुरवात झाली आहे. बाजार समितीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आर्थीक वर्षात २०२३-२४ अवघ्या १० महिन्यांच्या कार्यकाळात रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली. मागील वर्षी या बाजार समितीचे उत्पन्न १ कोटी १२ लक्ष ७१ हजार ३२४ रुपये होते.या उत्पन्नात निव्वळ नफा (वाढवा) २१ लक्ष ६१ हजार ७०३ रू होता. मात्र यावर्षी हा निव्वळ नफा (वाढवा) १ कोटी १० लक्ष १५ हजार ७८८ रु एवढा झाला आहे.रामटेक बाजार समितीचे कार्य क्षेत्र रामटेक तालुक्यापुरते मर्यादित आहे. बाजार समितीचा व्यवहार पारदर्शक राहावा व शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये म्हणून बाजार समितीचा आवारात सी. सी. टी. व्ही. कँमेरे बसविण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला मुख्य बाजारातील धान, गहु, हरभरा, फळे व भाजीपाला , फुल आदी उपबाजारांसह जनावरांचा बाजार भरारी पथक आणि बाह्य बाजार शुल्क आदिच्या माध्पमातुन उत्पन्न मिळत असल्याचे किरपान यांनी सांगितले.
शेतकरी- अडतिया- व्यापारी- संचालक मंडळ- कर्मचारी यांचा संयुक्त प्रयत्नाने यश :- सभापती सचिन किरपान*
बाजार समितीच्या व्यवहारत पारदर्शकता ठेवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.
शेतकर्यांसाठी सर्वतोपरी सोयीसुविधा पुरविण्याचा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा मानस आहे.
विद्यमान संचालक मंडळातील माझ्या सर्वच सन्माननिय सहकार्यांचे मनापासुन आभार मानतो, त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच सर्व निर्णय सहजरित्या घेता आले. या सर्व वाटचालीत समितीच्या शुभचिंतकांचे, माझ्या हितचिंतकांचे तसेच समितीच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व समितीच्या कर्मचाऱ्यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सभापती सचिन किरपाण यांनी माहिती देतांना सांगीतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













