३२-रायगड लोकसभा मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदान
प्रतिनिधी
मतदार याद्या परिपूर्ण असल्याने सुरळीत मतदान
रायगड :- दि.०८ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात दि.७ मे रोजी २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत एकूण १० लाख ९ हजार ५६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ६०.५१ टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ३३४ तर महिला मतदार ५ लाख ९ हजार २३३ असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.३२ रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ६८ हजार ३५२ मतदार असून ८ लाख ४७ हजार ७६३ महिला तर ८ लाख २० हजार ६०५ पुरष आणि ४ तृतीयपंथीय मतदार आहेत.
विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे
१९१-पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ३ हजार ३०८ इतके मतदार असून १ लाख ९५ हजार ६५३ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये १ लाख २ हजार २५५ पुरुष तर ९३ हजार ३९८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१९२-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ९७ हजार ३९६ मतदार असून त्यापैकी १ लाख ९८ हजार २८९ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये १ लाख ६२९ पुरुष तर ९७ हजार ६६० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१९३- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ६२ हजार २६६ मतदार असून त्यापैकी १ लाख ५४ हजार २५४ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ७५ हजार ९६८ पुरुष तर ७९ हजार २८६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१९४-महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८४ हजार ३८६ मतदार असून त्यापैकी १ लाख ६३ हजार ६९६ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ८३ हजार ४१६ पुरुष तर ८० हजार २८० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
२६३-दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८० हजार २६८ मतदार असून त्यापैकी १ लाख ६० हजार ७९८ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ७५ हजार ८१० पुरुष तर ८४ हजार ९८८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
२६४-गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४० हजार ७५५ मतदार असून त्यापैकी १ लाख ३५ हजार ८७७ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ६२ हजार २५६ पुरुष तर ७३ हजार ६२१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
३२ रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.मतदारसंघातील सर्व मतदार आणि मतदान प्रक्रियेतील सर्व, अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आभार मानले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













